उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar greeted all the people of Maharashtra on the occasion of Lord bhagawan Mahavira jayanti.

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या व घरातूनच प्रार्थना पूजा- अर्चना करावी असा संदेश ही उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. भगवान महावीर यांनी संपूर्ण विश्वाला मानव कल्याणचा विचार देऊन मुक्या प्राणीमात्रा वर प्रेम व दया करा, बंधुत्व, अहिंसा, शांतता यातूनच संपूर्ण जगाचे कल्याण होऊ शकते असा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यांचे हे विचार आपण सर्वांनी आचरणात आणले पाहिजे असे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व सद्याची स्थिती पाहता या वर्षी नागरिकांनी घराबाहेर पडू नये व एकत्र जणू नये, आप आपल्या घरातच पूजा प्रार्थना करावी असा संदेश अजित दादांनी दिला आहे.

Mukyamantri Ajit Dada pawar send a message for maharashtra