चाकरमानी म्हणजे काय । Chakarmani Meaning in Marathi

चाकरमानी म्हणजे काय । Chakarmani Meaning in Marathi – If You are searching Meaning of Chakarmani or Chakarmanee then you are reading the right article because i am going to tell you all about chakarmani (चाकरमानी).

महाराष्ट्रात सणासुदीचे दिवस सुरु झाले कि आपण न्यूज चॅनेल्स वर वारंवार ऐकतो कि चाकरमानी सणासुदी निमित्त गावाला निघाले. जास्त करून मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांबद्दल न्यूजमध्ये सांगितले जाते. आपल्या मनामध्ये प्रश्न आलाच असेल कि नक्की चाकरमानी म्हणजे काय? What is a meaning of Chakarmani?. असा प्रश्न मलाही पडला होता. इंटरनेटवर खुप शेअरच केल्यानंतरही मला काहीच योग्य माहिती मिळाली नाही. त्यामुळेच मी आपणा सर्वांसाठी माहिती गोळा केली व आता तुम्हा सर्वासमोर मांडत आहे.

चाकरमानी म्हणजे काय । Chakarmani Meaning in Marathi

“चाकरमानी म्हणजे वेगवेगळ्या खेड्या पाड्यातून शहरात येऊन नोकरी, चाकरी करणारी व्यक्ती म्हणजे चाकरमानी होय.”

कुटुंबाच्या उपजीविकेसाठी लोक गावाकडून शहराकडे येऊन नोकरी करत असतात. अश्या लोकांना गावाकडील कोक चाकरमानी म्हणून ओळखतात. चाकरमानी हा शब्द जास्त करून कोकणात वापरला जातो. कोकणच्या खेड्यातील लोक मुंबईमध्ये येऊन पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मानाची चाकरी करतात त्या लोकांना कोकणात चाकरमानी म्हणतात.

चाकरमानी फक्त कोकणातच आढळतात असे नाही तर महाराष्ट्रातील कोण्याही खेड्यातील व्यक्ती हा उपजीविकेसाठी नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी शहरात जातो त्याला चाकरमानी म्हणतात.

महाराष्ट्रात सण सुरु झाले कि सुट्टी निमित्त सण साजरे करण्यासाठी तसेच विश्रांती साठी चाकरमानी आप आपल्या गावाला निघतात. शहरात राहणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त असते यामुळे शासनाद्वारे त्यांच्यासाठी गावाकडे जाण्यासाठी विशेष रेल्वे व बस गाड्यांची सोया केली जाते.

शेवटचे शब्द: 

जगाच्या पाठीवर कोणतीही व्यक्ती आपले गाव सोडून परगावी नोकरीसाठी जाते त्यांना चाकरमानी म्हणतात. असंख्य लोक पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपले गाव सोडून परगावी चाकरी करतात. आम्हाला आशा आहे कि तुम्हाला चाकरमानी म्हणजे काय याचा अर्थ कळला असेल. वरील माहिती व्यतिरिक्त आपणांस या लेखामध्ये काही माहिती कमी वाटत असेल तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला कॉमेंट मध्ये लिहून सांगू शकता.