आणीबाणी म्हणजे काय?, आणीबाणी चे प्रकार व परिणाम

What is Emergency in Marathi

Today we are going to discuss Economic Emergency or Financial Emergency Meaning in Marathi. If you are looking for information about Arthik Aanibani then this is the right website.

नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आर्थिक आणीबाणी म्हणजे काय व आर्थिक आणिबाणी चे परिणाम काय होतात.

स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी १९६२ रोजी चीनशी व १९६५ रोजी पाकिस्तानशी झालेल्या युद्धामुळे मुळे आणीबाणी घोषित केली होती तसेच  २५ जून १९७५ रोजी सत्ता टिकविण्यासाठी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत संपूर्ण देशात आणीबाणी लागू केली होती. जवळपास २१ महिने म्हणजेच १९७५ ते १९७७ पर्यंत भारतात आणीबाणी लागू केली होती. तत्कालीन राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी संविधानातील ३५२ या कलमान्वये देशव्यापी आणीबाणी जाहीर केली होती.

आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनां मानली जाते.

आणीबाणी म्हणजे काय?

आणीबाणी बद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर लोकशाहीला स्थगिती देऊन हुकुमशाही पद्धतीने देशचा संपूर्ण कारभार चालवला जातो.

भारताची राज्यव्यवस्था हि लोकशाही पद्धतीने चालते. राज्यघटनेने देशातील प्रत्त्येक व्यक्तीस जगण्याचे, आपले मत मांडण्याचे स्वतंत्र अधिकार दिले आहेत म्हणजेच भारतात राहणाऱ्या प्रत्येकास व्यक्ती स्वतंत्र आहे. आणीबाणीच्या काळात याच व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली जाते. आणीबाणीमध्ये व्यक्तीच्या जगण्याच्या स्वातंत्र्या सोबतच, भाषण, विचार, लेखन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लागू होतात. या काळात समाज माध्यमानवर ही अनेक निर्बंध लादले जातात. आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाल एक वर्षांनी वाढवता येतो.

आणीबाणीचे प्रकार

भारतातील राज्यघटनेत तीन प्रकारची आणीबाणी आहे. ती पुढील प्रमाणे – 

  1. राष्ट्रीय आणीबाणी
  2. राज्य आणीबाणी / राष्ट्रपती राजवट
  3. आर्थिक आणीबाणी

राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५२ मध्ये राष्ट्रीय आणीबाणी सांगितली आहे. हि संपूर्ण देशासाठी किंवा देशातील विशिष्ठ भागासाठी लागू केली जाऊ शकते. युद्ध किंवा परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव (अंतर्गत अशांतता) अश्या परिस्थिती मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते.

राज्य आणीबाणी / राष्ट्रपती राजवट

कलम ३५६ व ३६५ या कलमान्वये राज्य किंवा घटक राज्य आणीबाणी / राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. घटनात्मक व्यवस्था कलमडली किंवा केंद्र शासनाच्या आदेशाचे पालन होत नसल्यास हि आणीबाणी संबंधित राज्यात लागू केली जाते.

आर्थिक आणीबाणी

कलम ३६० यामध्ये आर्थिक आणीबाणी येते. देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली किंवा आर्थिक स्थैर्य, पत धोक्यात आले तर राष्ट्रपतीद्वारे आर्थिक आणीबाणी लागू केली जाते. देशात आर्थिक मंदी, संसर्गजन्य रोज, महापूर किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आर्थिक आणिबाणी घोषित केली जाते. देशाचे आर्थिक स्थैर्य किंवा वित्त नियोजनात कमतरता आहे असे राष्ट्रपतींना वाटले तर ते अशा परिस्थितीत आणीबाणी लागू करू शकतात. अशा काळात देशातील कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक असते.

१९९० ते ९१ या काळात आठवडाभर पुरेल एवढाही अन्न धांन्य साठा उपलब्ध नव्हते त्यावेळेस आर्थिक आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती परंतु आणीबाणी लागू झाली नाही. आजपर्यंत भारताच्या इतिहासात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू केली गेली नाही.

सध्याच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचा बंद शासनाने जाहीर केला आहे. भारताची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असून बेकारीचे सावट देशात उभे राहिले आहे. सर्व आर्थिक उलाढाली ठप्प आहेत. अशा परिस्थितीत देशात आर्थिक आणीबाणीचे सावट आले आहे.

आर्थिक आणीबाणी चे परिणाम

आणीबाणीचे थेट परिणाम हे अर्थ व्यवस्थेवर होतो व आर्थिक व्यवस्थेचे चक्र थांबून याचा फटका समाजातील प्रत्येक वर्गाला होतो. सरकारी नोकरदार व कामगार यांच्या वेतनात कपात केली जाते तसेच पगारवाढीवर काही काळाकरिता निर्बंध घातले जातात. सार्वजिनक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन वेळेवर होण्याची कोणतीच शाश्वती नसते यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा सेवेवर होतो.

MPSC प्रश्न सोडवा संपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या.

तर आपण आजच्या लेखात पाहिलं कि नक्की आणीबाणी म्हणजे काय? व त्याचे परिणाम काय असतात. या व्यतिरिक्त तुमचे काही मत असल्यास खाली कमेंट करू शकता. धन्यवाद.

3 thoughts on “आणीबाणी म्हणजे काय?, आणीबाणी चे प्रकार व परिणाम”

  1. आणिबाणी मध्ये जनतेच्या कोण कोणत्या अधिकारावर आक्षेप घेतला जातो व नुकसान,

  2. आंनिबानीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण कोणते ग्रंथीचे कार्य आहे?

Leave a Comment