आपल्या सर्वाना माहित आहे कि एक इलेकट्रीक वाहन घेतल्यावर आपल्याला महाराष्ट्र सरकार कडून सबसिडी दिली जाते ज्यामुळे आपल्या गाडीची किंमत हि मूळ किमती पेक्षा कमी होते. सध्या महाराष्ट्र सरकार ev घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे त्यामुळे सबसिडी सोबत अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह सुद्धा दिला जात आहे. पण बऱ्याच बंधू भगिनींना ev खरेदी केल्यावर सबसिडी कशी apply करावी या बद्दल माहिती नसते आणि याबद्दल इंटरनेट वर सविस्तर माहिती उपलब्ध नाही त्यामुळे त्यांची सबसिडी बुडते. पण आता तुमची सबसिडी बुडू या साठी हे डिटेल आर्टिकल लिहिले आहे. जर तुम्ही नुकतीच एक ev घेतली आहे तरहि पोस्ट संपूर्ण वाचा.
अँप्लिकेशन ची प्रोसेस सुरु करण्याआधी महाराष्ट्र सरकारची किती subsidy आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह मिळेल आणि त्यासाठी असणाऱ्या अटी आणि शर्तीं या बाबत जाणून घेऊ.
How to Apply for Electric Vehicle (EV) Subsidy in Maharashtra
एक इलेकट्रीक वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला नक्की किती सबसिडी दिली जाते हे प्रथम जाणून घेऊ.
महाराष्ट्र सरकार ने इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी साठी प्रोत्साहन आणि प्रदूषण कमी व्हावे यासाठी सबसिडी देते या व्यतिरिक्त २ चाकी १ लाख, ३ चाकी १५ हजार आणि ४ चाकी १० हजार प्रारंभिक ग्राहकांना अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह म्हणजेच त्वरित नोंदणी सूट दिली जाते. जे पण लोक या त्वरित नोंदणी सूट ग्राहकांच्या यादी मध्ये समाविष्ट असतील त्यांना २, ३ आणि ४ चाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ५ हजार रुपये प्रति किलो वॉट प्रमाणे त्वरित नोंदणी सूट. दिली जाते. .
सबसिडी आणि इन्सेन्टिव्ह हे ev च्या बॅटरी च्या क्षमतेवर आधारित आहे म्हणजे जितक्या जास्त watt क्षमतेची बॅटरी तितकि जास्त सबसिडी. आता अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह च बोलायचं झालं तर प्रति वॅट ५ हजार रुपये मिळणार म्हणजे जर तुमच्या दोन चाकी गाडी मध्ये ३ kw चा लिथियम बॅटरी पॅक असेल तर तुम्हाला सबसिडी व्यतिरिक्त १५ हजार रुपये अतिरिक्त मिळतील पण २ व्हिलर साठी १० हजार रुपये लिमिट असल्याने १५ ऐवजी १० हजार मिळतील.. हेच ३ चाकी साठी मॅक्स लिमिट ३० हजार रुपये आणि चार चाकी साठी दिड लाख रुपये आहे.
म्हणजे जर तुम्ही एखादी स्कूटर खरेदी केलीआणि त्या गाडीची किंमत आहे १ लाख रुपये त्यातून महाराष्ट्राची सबसिडीची १० हजार रुपये आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह १० हजार असे २० हजार वजा केल्यास त्या गाडीची एक्स शोरूम किंमत हि ८० हजार रुपये इतकी होईल. अशा प्रकारे सबसिडी आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह दिला जातो. पण सबसिडी मिळविण्या करिता ग्राहकाला स्वतः apply करावं लागते. तसेच सबसिडी साठी काही अटी आणि नियम आहेत ते पुढील प्रमाणे.
Maharashtra ev policy 2022 subsidy T&C
नंबर १:
संबंधित ev फेम २ सबसिडी साठी पात्र असल्यास त्या गाडीवर महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळेल.
त्यामुळे गाडी घेते वेळी fame २ सबसिडी लागू आहे कि नाही याची स्वतः खात्री करा कारण बरेच ev dealers गाडी घेण्या आधी सबसिडी लागू असल्याचे सांगतात आणि गाडी घेतल्यावर ग्राहकांना कळते कि त्यांची फसवणूक झाली. जर तुम्हाला माहिती मिळत नसेल कि तुम्ही घेलेल्या किंवाघ्यायचा विचार करत असलेल्या गाडीला fame २ सबसिडी लागू होते कि नाही तर टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आपण तिथे डिस्कस करू शकतो.
नंबर २:
गाडीतील बॅटरी हि लिथियम tecchnology ची असावी लीड ऍसिड नसावी.
नंबर ३:
गाडी महाराष्ट्रात रजिस्टर केलेली असावी तेव्हाच ती गाडी सबसिडी साठी पात्र असेल.
नंबर ४:
ev चे रजिस्ट्रेशन आणि इनव्हॉईस २३ जुलै २०२१ नंतर चे असावे.
नंबर ५:
तुमच्या नावावर संबंधित कॅटेगरी मधील हि पहिली EV असावी दुसरी असले तर सबसिडी approve होणार नाही. म्हणजे जर तुम्ही २ व्हिलर कॅटेगरी मध्ये तुमच्या नावावर दुसरी E स्कूटर खरेदी केली तर सबसिडी मिळत नाही.
या सर्व अटी आणि नियम जर तुमची इलेकट्रीक वेहिकल पास करत असेल तर तुम्ही subsidy आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह साठी apply करू शकता.
आता जाणून घेऊ application प्रोसेस कोणत्या माध्यमातून करायची ते.
Maharashtra EV Policy 2022 (online & Offline website)
सबसिडी apply करण्यासाठी दोन पद्धत आहेत पहिली आहे ऑनलाईन आणि दुसरी आहे ऑफलाईन. पण एका डीलरने दिलेल्या माहिती नुसार तुम्हाला जर ऑनलाईन apply केल्यावर काही प्रॉब्लेम झाला किंवा सबसिडी रिजेक्ट झाली तर ऑफलाईन subsidy apply करावी लागेल म्हणजे subsidy लवकर मिळेल.
Apply: http://di.maharashtra.gov.in/vehicle/#/UserRegistration
ऑनलाईन मध्ये वेबसाईट च्या मार्फत सर्व प्रोसेस पूर्ण करावी लागेल आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि ऑफलाईन साठी फॉर्म आणि document तुम्हाला सरकारला पोस्ट करावे लागतील. ऑफलाईन साठी लागणारा फॉर्म, सेंडिंग ऍड्रेस आणि इतर माहितीची PDF लिंक खाली दिली आहे त्या मार्फत डाउनलोड करू शकता.
Maharashtra Electric vehicle Policy 2022 PDF
खालील लिंक द्वारे तुम्ही Maharashtra Electric vehicle Policy 2022 PDF डाउनलोड करू शकता.
डाउनलोड EV Policy PDF |
Maharashtra Electric vehicle Policy Format A application PDF
खालील लिंक द्वारे तुम्हीoffline apply करण्यासाठी Format A application फॉर्म PDF डाउनलोड करू शकता.
डाउनलोड Format A application फॉर्म |
आता बघू ऑनलाईन सबसिडी आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह apply करण्याची संपूर्ण प्रोसेस काय आहे?
Electric Vehicle Policy Subsidy Application Documents
apply करण्यासाठी तुम्हाला काही कागद पात्रांची आवश्यकता आहे ती पुढील प्रमाणे:
1. Pan card
2. Cancelled cheque
3. Registration certificate of vehicle (RC)
4. Invoice
5. Format A application (offline करीता)
Format A application तुम्हाला pdf file मध्ये मिळेल त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ऑफलाईन फॉर्म साठी तुम्हाला डीलर ची मदत लागेल कारण कंपनीच्या लेटरहेड वर संबंधित माहिती आणि डिलरचा शिक्का द्यावा लागतो त्यामुळे ऑफलाईन साठी डिलरची हेल्प घ्या. Offline आणि online दोन्ही प्रोसेस साठी सांगितलेली कागदपत्र आवश्यक आहेत. डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड करावी आणि हार्ड copy सरकारी पत्यावर सेंड करावी तो पत्ता खालील प्रमाणे:
Directorate of Industries Address: Directorate of Industries, 2nd Floor, New Administrative Building, Opposite Mantralaya, Mumbai – 400032
सबसिडी apply करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र सरकारची ऑफिसिअल वेबसाईट ओपन करावी लागेल. त्या नंतर तुम्हाला पोर्टल वर अकाउंट बनवावे लागेल जर तुम्ही आधी रजिस्ट्रेशन केलं आहे तर लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. जर अकाउंट नसेल तर संपूर्ण नाव, email, username, password सारखी माहिती भरून अकाउंट बनवा आणि त्या नंतर अकाउंट लॉगिन करा.
लॉगिन केल्यावर तुम्हाला माहिती अचूक भरायची आहे त्या साठी प्रथम फॉर्म वाचून घ्या आणि मग भरा. अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह साठी तुम्हाला वेगळे डिटेल्स किंवा इतर काही माहिती द्यावी लागत नाही जर तुम्ही शिल्लक कोट्यात बसला तर सबसिडी सोबत अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह जमा होईल.
how to apply for electric vehicle subsidy in maharashtra
फॉर्म कसा भरावा या साठी विडिओ पहा
अश्या पद्धतीनं apply केल्यावर ९० दिवसांच्या आत तुमच्या अकॉउंट वर सबसिडी प्लस अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह जमा होईल. आशा करतो कि तुम्हाला या पोस्टचा नक्की फायदा झाला असेल.शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.