लेक लाडकी योजना : मुलींना मिळणार 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये

महाराष्ट्र लेक लाडकी योजना संबंधी आज आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने या आर्थिक वर्ष मध्ये २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पात लेक लाडकी हि योजना सुरु कर्णाची घोषणा केली आहे या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, कागदपत्र काय लागणार पैसे कधी मिळणार या सर्व विषयी माहिती जाणून घेणार आहोत त्या साठी हा लेख सविस्तर वाचा.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना :

महाराष्ट्र सरकार बरोबर अनेक राज्य सरकार महिला आणि मुलींसाठी महत्वाच्या योजना आणत आहेत. अनेक योजनांच्या अध्यमातून मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने २०२३-२०२४ या आर्थिक वर्ष च्या अर्थ संकल्पात लेक लाडकी योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. लेक लाडकी या योजने मध्ये मुलगी तिच्या जन्मापासून ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत मुलींना दिली जाईल.

१८ वर्ष नंतर मुलींना ७५००० रुपये मिळणार

महाराष्ट्र लेक लाडकी योजना : लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मावर ५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्याच सोबत मुलगी इयत्ता पहिल्या  या वर्गात गेल्यावर तिला सरकारकडून ४००० रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर मुलगी ६ वि वर्गात गेल्यावर तिला ६००० रुपये मदत दिली जाईल. त्यानंतर मुलगी ११ वि मध्ये गेल्यावर तिला ८००० रुपये दिले जातील. त्यानंतर मुलगी १८ वर्षाची झाल्यावर तिला महाराष्ट्र शासनाकडून ७५००० रुपये मिळतील.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना चा फायदा कोणाला मिळणार

महाराष्ट्र लेक लाडकी योजना चा लाभ महाराष्ट्रातील मुलींना मिळणार पण ज्यांच्या कडे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहेत अशा मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुलीच्या पुढील शिक्षणासाठी पैसे मुलीच्या बँक खात्यात थेट जमा केले जातील. या योजने अंतर्गत मुलीचा जन्म सरकारी रुग्णालयातच झाला पाहिजे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ कुटुंब पात्र असतील. त्याचसोबत योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांचे हि बँक मध्ये खाते असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे 

  1. पालकाचे आधारकार्ड
  2. मुलीच्या जन्माचा दाखला
  3. पिवळे किंवा केशरी रंगाचे रेशनकार्ड
  4. उत्पन्नाचा दाखला
  5. राहवासी दाखला
  6. मोबाइल नंबर
  7. बँक चे पासबुक
  8. पासपोर्ट साइझ फोटो