ओकिनावा ओकी ९० या इलेक्ट्रिक वाहनांची मराठीत सर्व माहिती

ओकिनावा कंपनीने okhi ९० या हाय स्पीड स्कूटचे अनावरण केले आहे आणि महत्वाची गोष्ट अशी कि गाडी संपूर्ण पणे भारतात डिजाईन करून बनवली आहे. कंपनीने सांगितल्या नुसार गाडी १६० किलोमीटरची रेंज देईल आणि ९० किलोमीटर प्रति तास इतके टॉप्सपीड असेल. शिवाय महाराष्ट्रात किंमत देखील फक्त १ लाख ३ हजार रुपये असेल. चला जाणून घेऊ गाडीचे स्पेसिफिकेशन आणि महाराष्ट्रातील किमतीचे गणित.

ओखी ९० या इलेक्ट्रिक वाहनांची सर्व माहिती (Okinawa Okhi 90 in Marathi)

ओकिनावा भारतातील २ ऱ्या क्रमांकाचा टॉप ev सेलिंग ब्रँड आहे पण ओकिनावा नेहमी चायनातून गाड्या इम्पोर्ट करून भारतात विकत होती पण लोकांचा चायना वरील राग आणि इंटरनेट वरून मिळणारी माहिती याने लोक जाणते होत होते आणि ather, ओला, बजाज यांच्या गाड्यांकडे वळत होते. याचे कारण हि तसेच होते कारण मी सांगितलेल्या कंपन्या प्रीमियम गाड्या विकतात. आता ओकिनावाला मार्केट मध्ये राहण्यासाठी आणि ather, ओला, बजाज याना टक्कर देण्यासाठी सेल्फ developed आणि प्रीमियम गाडी लाँच करण भाग होत म्हणूनच कंपनीने okhi ९० या प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर ला लाँच केले आहे.

कलर आणि डिजाईन

okhi ९० मध्ये ग्लॉसी ऐश ग्रे, ग्लॉसी ज्वेलरी ब्लू, ग्लॉसी पर्ल व्हाईट, ग्लॉसी वाईन रेड असे ४ कलर उपलब्ध आहेत. ev ची डिजाईन हि एकदम क्लासी असून सेटल्ड लुक दिला गेला आहे. म्हणजेच हि गाडी जास्त स्पोर्टी नाही आणि जास्त क्लासिक हि नाही त्यामुळे कोणत्या हि वयोगटातील लोक या गाडीला पसंत करतील. स्कूटर रोड वर धावताना कोणीही हि इलेकट्रीक स्कूटर नसून एक पेट्रोल स्कूटर आहे असे सांगेल.

मिळेल असे कंपनी क्लेम करते पण एक लक्ष्यात घ्या कि हि रेंज arai certified रेंज आहे जी नॉर्मल कंडिशन मध्ये टेस्ट केली जाते पण रोजच्या वापरात १३० किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते

मोटर आणि बॅटरी (Okhi 90 Motor & Battery in Marathi)

okhi ९० या स्कूटर मध्ये सेंटर माऊंट बेल्ट ड्राइव्ह ३८०० वॅट पीक पॉवर निर्माण करणारी ip ६५ रेटेड मोटर दिली आहे त्यामुळे इव्ही ८० ते ९० चे टॉप स्पीड अचिव्ह करते. १२ डिग्री चे चढ आरामात चढते. या मोटर वर ३ वर्षाची वॉरंटी दिली जाईल.

बॅटरी म्हणजे गाडीचे हृदय असते कारण किती ही टॉप स्पीड दिले किंवा पॉवर दिली तरी एक चांगली बॅटरी असणे आवश्यक असते म्हणूनच या स्कूटर मध्ये ७२ वोल्ट आणि ३.६ kwh ची लिथियम आयन डिटॅचेबल बॅटरी दिली आहे. detachable बॅटरी मुळे कुठेही चार्जला लावू शकता. ३.६ kwh बॅटरीमुळे १६० किलोमीटर रेंज मिळेल असे कंपनी क्लेम करते पण एक लक्ष्यात घ्या कि हि रेंज arai certified रेंज आहे जी नॉर्मल कंडिशन मध्ये टेस्ट केली जाते पण रोजच्या वापरात १३० किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते. बॅटरी सोबत देखील ३ वर्षाची वॉरंटी दिली जाईल. बॅटरी सोबत portable चार्जर दिला जाईल जो बॅटरी ० ते ८० टक्के चार्ज १ तासात करेल आणि १०० टक्के चार्ज ३ ते ४ तासांमध्ये करेल. गाडी मध्ये फास्ट डीसी चार्जर उपलब्ध नाही कारण कुठेही त्याचा उल्लेख आढळला नाही.

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स (Oki 90 Specifications & Features in Marathi)

इव्ही ला फ्रंट ला आणि रिअर ला १६ इंची आलोय व्हील्स दिले आहेत व्हील बेस आहे १५२० mm इतका. combined Braking system फिचर असणारे डिस्क ब्रेक्स दिले आहेत. भारतातील रोड तुम्हाला माहितीच आहेत म्हणून कम्पनीने राईड quality चांगली व्हावी या साठी मोठे व्हील्स सोबत दमदार सस्पेन्शन दिले आहे. फ्रंट ला टेलेस्कोपिक आणि रिअर ला ड्युअल ट्यूब सस्पेन्शन दिले आहे. १७५ mm च्या ग्राऊंड क्लिअरन्स मुळे स्कूटर कुठेही घासणार नाही, डिकी मध्ये ४० लिटर इतका बूट स्पेस दिला आहे.

सीट ची लेन्थ ९०० mm इतकी देण्यात आली आहे, गाडीचे डायमेन्शन्स पुढील प्रमाणे आहेत. 2220 x 710 x 1160 mm. फ्रंट ला १००/८० १६ चा ट्यूब लेस tyre दिला आहे तर पाठीमागे १२०/८० चा टायर दिला आहे. स्पीडोमीटर गाडीमध्ये कलर आणि डिजिटल दिला गेला आहे, गाडीचा जो कंट्रोलर आहे तो e-abs आणि regenrative braking system सपोर्ट करतो ज्याने स्कूटर उतारावर चार्ज होईल आणि गाडीची रेंज वाढेल.

सर्व प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न नेहमी असतो कि गाडी वजन किती वाहून नेईल बरोबर? तर मी तुम्हाला सांगू इच्चीतो कि okhi ९० २६० किलो पर्यंत वजन सहन करू शकते याचा अर्थ असा कि २ व्यक्ती आणि काही सामान ठेवलं तरी गाडीला काहीही फरक पडणार नाही.

स्कूटर मध्ये सर्व लाईट्स या led वापरण्यात आल्या आहेत जेणेकरून बॅटरी कांजप्शन कमी होईल. okhi ९० हि लेटेस्ट टेक्नोलोंजि ने बनली आहे त्यामुळे app कनेक्टड आहे. यामध्ये ओकिनावा कनेक्ट अँप चा वापर केला गेला आहे. याच सोबत की लेस इंट्री रिमोट, की लॉकिंग सिस्टिम, पार्किंग मोड, ऑन बोर्ड usb चार्जिंग सॉकेट, रिअल टाइम ट्रॅकिंग, अँटी थेफ्ट अलार्म, side stand सेन्सर या सारखे ऍडव्हान्स फीचर्स दिले आहेत.

महत्वाचं म्हणजे ओकिनावाची okhi ९० स्कूटर ICAT/ARAI Approved स्कूटर आहे त्यामुळे स्कूटर वर बिनधास्त विश्वास ठेऊ शकता आणि approved असल्याने स्कूटर वर सबसिडी सुद्धा उपलध आहे. आता सबसिडी च नाव आलंच आहे तर जरा गाडीची महाराष्ट्रात सबसिडी आणि किंमत याच गणित जाणून घेऊ.
कॅंपिंग १०००० रु.

okhi 90 इलेक्ट्रिक गाडीची महाराष्ट्रात किंमत आणि सबसिडी 

कंपनीच्या लाँच इव्हेंट मध्ये स्कूटर ची एक्स शोरूम किंमत हि fame २ सबसिडी लेस करून १ लाख २१ हजार ८६६ रुपये सांगितली आहे आणि लिस्ट मध्ये महाराष्ट्रात एक्स शोरूम किंमत १ लाख ३ हजार ८६६ रुपये सांगितली आहे. आता सर्व भारतात काही ठराविक राज्यात स्कूटर कमी किमतीत मिळणार आहे आणि याचे कारण आहे राज्य सरकार ची सबसिडी. आता महाराष्ट्रात किती सबसिडी मिळेल तर १ लाख २१ हजार ८६६ रुपये यातून राज्य सरकारची सबसिडी 1 kwh battery 5000 रुपये या प्रमाणे 3 kwh बॅटरी म्हणजे 15000 पण कॅपिंग 10,000 रुपयाचं आहे 10 हजार amount लेस केली तर झाले १ लाख ११ हजार ८६६ रुपये होतात. पण कंपनीने १ लाख ३ हजार ८६६ रुपये महाराष्ट्रात किंमत असल्याचे सांगितले आहे. वरच्या 8 हजारांच गणित मला लागत नाहीये जर तुम्हाला समजले तर कॉमेंट मध्ये सांगा.. कदाचित early bird incentive ची शेवटची तारीख मार्च नंतर वाढणार असेल.