Patriarchy meaning in Marathi | Patriarchy म्हणजे काय ?

Patriarchy meaning in Marathi

नमस्कार वाचकहो , आज आपण बघणार आहोत पितृसत्ताक कुटुंबपद्धति. या लेखात तुम्हाला पितृसत्ताक कुटुंबपद्धति म्हणजे काय ? मातृसत्ताक कुटुंबपद्धति आणि ह्या दोन्ही गोष्टींचा  समाजावर काय प्रभाव पडतो याची माहिती  देण्याचा प्रयन्त केला आहे.

पितृसत्ताक कुटुंबपद्धति म्हणजे काय ?

कुटुंबातील  सर्व घटक व्यक्तींवर  वडीलधाऱ्या व्यक्तीची व पित्याची थोडक्यात वडीलधाऱ्या पुरुषाची  अधिसत्ता म्हणजे पितृसत्ताक कुटुंबपद्धती.पितृसत्ताक कुटुंबपद्धती असणाऱ्या कुटुंबात सर्व कुटुंब मंडळीं हिताचे  नियंत्रित करायचे अधिकार हे ,वयाने  जबाबदारीने मोठ्या असणाऱ्या पुरुषाकडे असतात . भारतासोबत अनेक देशात काळाप्रमाणे पुरुषसत्ताक अधिकाऱ्यांच्या मर्यादा वेगवेगळ्या दिसतात. मालमत्तेचा वारसा असो समाजात असलेले स्थान असो ह्या गोष्टी पित्याच्या वंश परंपरेने चालतात या प्रकारच्या परंपरा आणि पितृसत्ताक कुटुंबपद्धति भारतासह जपान आणि चीन शिवाय प्राचीन यूरोपात पहावयास मिळतात. सुरवातीच्या कालखंडात कुटुंबाचे सर्व अधिकार ,कुटुंबियांच्या मर्यादा ,मालमत्ता हक्क ,मुलामुलीचें विवाह निर्णय इतकेच काय तर कुटुंबियातील व्यक्तींना विकून टाकण्याचे निर्णयदेखील पुरुषांच्या हाती असे.अरबांच्या कुटुंबपद्धतिमध्ये अशीच अमर्याद पितृसत्ता होती. हि पितृसत्ताक कुटुंबपद्धति आजच्या काळात असली तरी पित्याच्या अधिकाऱ्याला पूर्वीपेक्षा बऱ्याच मर्यादा वाढल्या आहेत.

मातृसत्ताक कुटुंबपद्धति म्हणजे काय ?

वाध्य संस्कृतीच्या काळात मानवी समाजात मातृसत्ताक कुटुंबपद्दती होती म्हणजे पुरुषाने कुटुंबासाठी अन्नव्यवस्था करणे बाहेर आर्थिक परिस्थीची कामे करणे आणि स्त्रीने घर सांभाळणे ,घरातल्या प्रत्येक व्यक्तीची खाण्यापासून ते छोट्या छोट्या गोष्ठीकडे लक्ष देणे असे श्रमविभाजन होते. पण शेतीचा शोध मात्र  स्त्रीनेच लावला असे  मानले जाते. आणि शेतीच्या शोधांनंतर माणूस अश्या पद्द्तीचे आयुष्य जगू लागला .समाजात उत्पादके  निर्माण झाली अश्या गोष्ठी मध्ये स्त्रीचाच  हातभार जास्त होता पण तरीहि अश्या काही गोष्टी होत्या ज्यात स्त्रीला वगळले जायचे जसे युद्धात स्त्रीला  सहभाग दिला तर पुढील वंश नष्ठ होईल थोडक्यात वंशवृद्धीसाठी स्त्रीला जपणे अश्या अनेक काळजीपोटी तिच्यावर बंधणे आणण्यात आली.

पितृसत्ताक कुटुंबपद्धति आणि  मातृसत्ताक कुटुंबपद्धति यांचा समाज प्रभाव

पितृसत्ताक कुटुंबपद्धतिमुळे मानवाने पुरुषाच्या बाबतीतले नियम, अधिकार, मर्यादा आणि मूल्ये समाजात स्वीकारले असले तरी स्त्रियांना समाजात मिळणारी वागणूक आणि पुरुषांना मिळणार दर्जा यामुळे एकंदरीत पितृसत्ताक कुटुंबपद्धतिने समाजव्यवस्थेवर प्रभाव टाकला आहे . भारतामद्ये गारो , खासी आणि केरळमध्ये  सोडली तर सर्व जातीजमाती पितृसत्ताक कुटुंबपद्धति प्रमाणे चालणाऱ्या आहेत. आर्य लोकांची कुटुंबपद्दतही पितृसत्ताक असल्यामुळे आणि त्यांच्या संस्कृतिप्रसारामुळे मातृसत्ताक कुटुंबपद्धती बंद झाली असावी .

Leave a Comment