जाणून घ्या रिवोल्ट आर व्ही ४०० (Revolt RV 400) महाराष्ट्रातील किंमत, सबसिडी, फीचर्स, टेक्निकल माहिती

देशातील पहिली इलेक्ट्रिक बाईक revolt आर व्ही ४०० या गाडीची संपूर्ण माहिती आज आपण या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. गाडीचे स्पेसिफिकेशन, फिचर्स आणि महाराष्ट्रातील किंमत आणि sabsidy याची संपूर्ण माहिती तुम्हाला आज सांगणार आहे.

रिवोल्ट आर व्ही ४०० (Revolt RV 400) महाराष्ट्रातील किंमत, सबसिडी, फीचर्स, टेक्निकल माहिती

एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायचं म्हटलं कि सर्वात पहिला प्रश्न कंपनी कुठली आहे? बरोबर? इंटरनेट वर तुम्हाला सर्व गाडी बद्दल माहिती देतील, किमती बद्दल माहिती देतील पण कंपनी बद्दल कोणीच बोलत नाही म्हणूनच आम्ही नेहमी गाडीची माहिती सांगताना पहिला कंपनीची माहिती देतो आजही रिवोल्ट ची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे.

कंपनीची माहिती:

revolt motors हि कंपनी जयपूर स्थित असून मायक्रोमॅक्स कंपनीचे को फाउंडर राहुल शर्मा यांनी रिवोल्ट इंटेलेकॉर्प या कंपनीची सुरुवात केली आहे. रिवोल्ट च्या e मोटारसायकल या हरयाणातील मानेसर येथील manufaturing facility center मध्ये निर्माण केल्या जातात.

रिवोल्ट आर व्ही ४०० चायनीज इंपोर्टेड आहे कि भारतीय?

रिवोल्ट आर व्ही ४०० हि bike संपूर्ण पणे Super Soco TC Max चा प्लॅटफॉर्म वापरून तयार करण्यात आली आहे. आणि Soco हि कंपनी चायनीज आहे आणि hedquarter शांघाय येथे आहे. Super Soco TC Max या पेक्षा revolt आर व्ही ४०० चांगले package provide करते या गाडी मध्ये परफॉर्मन्स आणि specifications vise बदलावं केले गेले आहेत आणि गाडी भारतातच तयार केली जाते.

ज्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कि revolt आर व्ही ४०० हि गाडी भारतातील पाहिली इलेक्ट्रिक मोटार सायकल आहे या शिवाय हि भारतातील पहिली गाडी आहे जिच्या सोबत 6 वर्षाची warranty मिळते. चला आता गाडीची सर्च टेक्निकल माहिती आणि महाराष्ट्रातील sabsidy व किंमत जाणून घेऊया.

Read: टाटा नेक्सॉन इव्ही आता देणार ४०० किमी पेक्षा जास्त रेंज

कलर:

Revolt आर व्ही 40० मध्ये ३ कलर ऑपशन्स दिले आहेत. रेबेल रेड, मिस्ट ग्रे आणि कॉस्मिक ब्लॅक.

मोटर आणि बॅटरी:

revolt आर व्ही ४०० या bike मध्ये ३ kw क्षमतेची mid belt drive मोटार दिली आहे. motar center ला दिली असल्याने गाडीचे वेट बॅलन्स राहते आणि चांगला एक्सपेरिअन्स मिळतो. गाडीमध्ये ३ रायडींग मोडस दिले, इको ज्यामध्ये गाडीचे टॉप स्पीड ४५ km प्रति तास इतके होते, नॉर्मल मोडे मध्ये टॉप स्पीड ६५ km आहे आणि sports मोड मध्ये ८५ km इतका टॉप स्पीड दिला आहे.

Read: How to apply for electric vehicle subsidy in Maharashtra 2022

bike मध्ये ७२ वोल्ट आणि ३.२४ kw क्षमतेचा removable लिथियम आयन बॅटरी पॅक दिला आहे जो ४.५ तासात ० ते १०० टक्के चार्ज होतो, ४०० च्या बॅटरी मध्ये कोणते सेल वापरण्यात आले आहेत याबद्दल सविस्तर सांगितलेले नाही. गाडी ० ते ७५ टक्के चार्ज फक्त ३ तासात होते. या शिवाय बॅटरी station ला तुम्ही काही अमाऊंट देऊन बॅटरी स्वॅप करू शकता. ३.२४ kw बॅटरी मुळे इको मोड मध्ये १५० km ची रेंज मिळते, नॉर्मल मोड मध्ये १०० km ची रेंज मिळते आणि स्पोर्ट्स मोड मध्ये ८० km ची रेंज मिळते. सांगितलेली रेंज हि ARAI सर्टिफाईड आहे रिअल रेंज थोडी कमी असेल. user च्या सांगण्या नुसार इको मोड मध्ये रिअल रेंज १३० ते १४० किमी च्या दरम्यान मिळते. बॅटरी फुल चार्ज करण्यासाठी ४ युनिट्स इलेक्रीसिटी खर्च होते म्हणजे २८ रुपये खर्च येतो आणि battery switch station ला बॅटरी स्वॅप करण्यासाठी ७५ रुपये खर्च येतो. बॅटरी चे वजन २२ किलो इतके आहे.

स्पेसिफिकेशन्स:

गाडीचे व्हील्स १३५० mm दिले आहेत फ्रंट ला ९०/८० १७ चे tyre आणि रिअर ला १२०/८० १७ चे tyre दिले आहेत. बोथ side डिस्क ब्रेक्स पाहायला मिळतात आणि दोन्ही side च्या डिस्क २४० mm साईज च्या आहेत. रिअर ला मोनोक्रॉस adjustable सस्पेन्शन दिले आहे आणि रिअर ला upside down fork telescopic suspension दिले गेले आहे. आर व्ही ४०० चे संपूर्ण वजन १०८ kg असून गाडीची वेट लोडींग कपॅसिटी १५० kg आहे, ग्राउंड clearance २१० mm दिला आहे ज्यामुळे गाडी कोणत्याच स्पीड ब्रेकरला घासणार नाही, सीट ची लेन्थ ८१४ mm दिली आहे. बाईक मध्ये जिथे जिथे लाईट्स दिली आहे तिथे led lights चा वापर केला आहे. गाडीला ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले दिला आहे आणि हा डिस्प्ले touch स्क्रीन नाही. गाडी ai app रेडी आहे त्यामुळे गाडी लॉकेट करणे, geo tagging, geo fencing, soc चेक करणे या सारखे advance फीचर्स दिले गेले आहेत.

वॉरंटी:

रिवोल्ट ने तगडी वॉरंटी गाडी सोबत दिली आहे battery ला तब्ब्ल 1 lakh km किंवा 6 years आणि बाकी bike वर 75000 km किंवा 5 years ची वॉरंटी दिली आहे.

रिवोल्ट आर व्ही ४०० ची किंमत आणि महाराष्ट्ररतील सबसिडी.

रिवोल्ट आर व्ही ४०० या bike ची महाराष्ट्रात एक्स शोरूम किंमत १,२५,९९९ रुपये आहे हि किंमत सेंट्रल गव्हर्मेंट ची fame २ subsidy कमी करून आहे. showroom ने दिलेल्या माहिती नुसार ६४००० रुपये fame २ subsidy दिली जाते. जर सुबसिडी नाही मिळाली तर गाडीची किंमत 1,89,999 रुपये होईल.

आता जाणून घेऊ महाराष्ट्र सरकारची सब्सिडी आणि अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह किती मिळतो आणि फायनल किंमत किती होते.

बाईक ची बॅटरी ३ kw ची आहे आमी महाराष्ट्र सरकार प्रति किलो वॅट ५००० रुपये सबसिडी देते पण १०,००० चे लिमिट असल्याने या गाडी वर १०,००० रुपये सबसिडी मिळेल आणि जर गाडी मार्च २०२२ च्या आत खरेदी केली तर त्यावर १५००० अर्ली बर्ड इन्सेन्टिव्ह मिळेल टोटल २५००० महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळेल आणि गाडीची एक्स शोरूम किंमत हि १ लाख ९९९ रुपये होईल यात इन्शुरन्स आनि हँडलिंग चार्जेस ७ ते १० हजार वाढतील आणि महाराष्ट्रात फायनल पेमेंट होईल १ लाख ७ हजार ते १ लाख १० रुपयांच्या दरम्यान.

पण…. सध्या महाराष्ट सरकारची सबसिडी मिळत नाही असे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत तसेच सबसिडी क्लेम करण्यासाठी तयार केलेली website फॉर्म accept करत नाही. त्यामुळे गाडीची किंमत हि १,२५,९९९ एक्स शोरूम आहे हेच गृहीत धरावं आणि महाराष्ट सरकार ने सबसिडी देणं सुरु केलं तर मात्र तुम्हाला १ लाख ९९९ रुपयात गाडी एक्स शोरूम किंमत पाहायला मिळेल. जर तुम्ही कोणतीही इलेक्ट्रिक गाडी घेतली आहे तर तुमहाला महाराष्ट्र सरकारची सबसिडी मिळाली कि नाही हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा.