टाटा नेक्सॉन इव्ही आता देणार ४०० किमी पेक्षा जास्त रेंज

Tata Nexon EV 400 km range upgrade – टाटाची पहिली आणि यशस्वी इलेक्ट्रिक गाडी नेक्सॉन इव्ही आता कात टाकणार आहे आणि या गाडीचे नवीन 2.0 वर्जन काही महिन्यातच लाँच होणार आहे. नवीन येणाऱ्या या मॉडेल मध्ये 400 km ची रेंज दिली जाईल ज्यामुळे ही गाडी लाँग ड्राईव्ह साठी उपयुक्त होईल. 28 जानेवारी 2020 हा तो दिवस आहे ज्या दिवशी टाटा ची नेक्सॉन इव्ही लाँच करण्यात आली होती. लाँच झाल्या पासून कंपनीने ग्राहकांचे फीडबॅक घेऊन अनेक छोटे मोठे बदलाव केले आहेत पण आता कंपनी एक मेजर चेंज करणार आहे ज्याने नेक्सन ची 100 km ने वाढणार आहे.

नेक्सॉन इव्ही मध्ये सध्या झीप्ट्रोन टेकनॉलॉजी चा वापर केला आहे. पर्मनन्ट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर दिली आहे जी 129 पीएस पॉवर आणि 245 एनएम टॉर्क जनरेट करते. या मोटर सोबत ip 67 डस्ट आणि वॉटर प्रूफ 30.2 kwh लिक्वीड कूल बॅटरी पॅक दिला आहे. 8 वर्ष किंवा 1.60 लाख किलोमीटर ची वारांटी यावर दिली गेली आहे. सध्याच्या मॉडेल मध्ये ARAIरेंज 312 दिली आहे पण नॉर्मल युसेज मध्ये गाडी 220 ते 250 km ची रेंज देते. 14 लाखा पासून स्टार्ट होणाऱ्या या गाडीचे टॉप मॉडेल 17 लाखा पर्यंत जाते. पण आता कंपनी नेक्सॉन इव्ही चे अपग्रेडेड मॉडेल लॉन्च करणार आहे ज्यात 30.2 kwh ऐवजी 40 kwh चा बॅटरी पॅक देण्यात येईल जो गाडीची रेंज 100 km ने वाढवेल. अपग्रेडेड गाडीत Arai 400+ km रेंज क्लेम केली जाईल आणि 220 ते 250 km रायडिंग रेंज मिळणाऱ्या गाडी मध्ये आता 300 ते 320 km ची सिंगल चार्ज रेंज दिली जाईल. बॅटरी व्यतिरिक्त गाडी मध्ये थोडे फार कॉस्मेटिक बदलाव केले जातील या शिवाय एक्स्ट्रा बॅटरी मुळे बूट स्पेस सुधा कमी होणार आहे. 10 kwh चा बॅटरी पॅक वाढल्याने गाडीचे 100 किलो ने कर्ब वेट वाढणार आहे. असे पण रुमरस आहेत की नेक्सॉनच्या अलॉय व्हील्स मध्ये बदलाव केले जाणार आहेत आणि गाडी मध्ये काही अडवन्स फीचर्स सुधा इंट्रोड्युस केले जातील.

नेक्सॉन च्या अपग्रेडेड मुळे किंमत सुधा वाढेल आणि 14 लाखा पासून स्टार्ट होणारी किंमत 17 ते 18 लाख वर जाईल. 3 लाखां पर्यंत गाडीची किंमत वाढू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. टाटाची नेक्सॉन इव्हीएम जी झेड एस इव्ही आणि ह्युंदाई कोना यांच्याशी आता कंपिट करेल. नेक्सॉन या वर्षाच्या एप्रिल ते जुलै क्या दरम्यान लाँच केली जाऊ शकते.