टोल नाके बंद होऊन जीपीएस टोल प्रणाली लागू होणार: जाणून घ्या सर्व माहिती

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नॅशनल हायवे टोल प्लाझावर 1 जानेवारी 2021 पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग आवश्यक असल्याचं सांगितलं. त्यानंतर सरकारने फास्टॅगची शेवटची तारीख वाढून 15 फेब्रुवारी 2021 केली. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर गाड्यांच्या लांबच लांब रांगांपासून सुटका होण्यासाठी फास्टॅग सिस्टम आवश्यक करण्यात आली. लोकांनी ३०० रुपये fastag खरेदी केला या शिवाय अनेक ठिकाणी दुप्पट तोल देखील भरला आहे.परंतु आता मागील वर्षीच सुरू करण्यात आलेली ही टोल कलेक्शनची पद्धत लवकरच बदणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे गाडीच्या काचेवर असणारा tag आता लवकरच बॅड होण्याचे संकेत आहेत.

१०० किमी पर्यंत रेंज देणाऱ्या तीन जबरदस्त Joy eBike कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच

संसदेत fast tag संदर्भात एक अहवाल सादर केला आहे त्यामुळे. फास्टॅगद्वारे टोल वसुली न करता आता जीपीएस पद्धतीने टोल भरण्याची व्यवस्था लागू होईल. यासाठीची प्रक्रिया सुरू असल्याचीही माहिती आहे. अनेकदा फास्टॅग असतानाही तो टोल भरण्यास करताना अडचणी येतात, यात वेळही वाया जात असल्याचं सांगण्यात आलं आहे या शिवाय खात्यात पैसे असूनही फास्ट टॅग रीड न झाल्याने चालकाला दुप्पट टोल द्यावा लागतो.

काय आहे gps toll collection पद्धत? (What is GPS Toll in marathi)

GPS-based toll collection हे इंटरनेट च्या माध्यमातून sate light शी कनेक्ट असेल. २०१९ पासून निर्मित सर्व गाडयांना टाकिंग सिस्टीम इनबिल्ट देण्यात आले आहे याच्या माध्यमातून colection पॉईंट जवळ गेल्यावर GPS शी coordinate करून हे नवीन तंत्रज्ञान तुमच्या अकॉउंट मधून पैसे deduct करेल.

फायदा होणार कि तोटा? (Toll Newsटोल नाके बंद होऊन जीपीएस टोल प्रणाली लागू होणार: जाणून घ्या सर्व माहिती )

gps टोल सिस्टिम चा सामान्य जातेला फायदा होणार आहे. कारण तुम्ही जितका हायवेच्या वापर करणार तितकेच पैसे तुमच्या अकाउंट मधून deduct होणार.

म्हणजे जर तुम्हाला पुण्याहून पवना लेक कॅम्पिंग ला जायचे आहे त्या साठी तुम्ही हायवेच्या वापर करता अश्या वेळेस तुम्हाला fast tag मुळे लोणावळ्या पर्यंतचा १८० रुपये टोल द्यावा लागतो पण जर gps toll system आली कि तुम्हाला फक्त पवना कॅम्पिंग पर्यंत use केलेल्या रोड चा टोल बारावा लागेल म्हणजे १०० रुपये वगरे. म्हणजे ८० रुपये वाचतील. अश्या पद्धतीने हि प्रणाली काम करेल.